Think Every Day
Think Every Day
“Kuthe Shodhishi Rameshwar Ann Kuthe Sodhishi Kashi Hrudayatil Bhagwant Rahila Hrudayatun Upashi.”
In our pursuit of the divine, our temples, mosques, gurudwaras, and churches overflow with devotees. Yet, amidst this fervor, we risk losing sight of something paramount: our humanity.
Amidst the rush of modern life, if we pause to reflect sincerely, we're compelled to ponder: Who orchestrates the intricacies of my existence? My tongue is blessed with the "Abhishek" from thee. What force (Philosophical standpoint) propels the circulation of blood throughout my body? Certainly, it is not solely of my doing. This realization unveils the presence of a supreme, invisible power orchestrating these phenomena within every human being.
Sarvasye chhaham Hrudi sannivishto (सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो)" - The realization of the presence of that invisible entity within me instigates a profound transformation. With the sacred teachings of the Shreemad Bhagvad Geeta, it offers a divine and unequivocal solution to all universal crises through holy contemplation.
I am filled with pride to present this sculpture to you at this exhibition, as it was inspired by the teachings of the eminent philosopher Shri Pandurang Shastri Athavale (Dada) of the Swadhyay Parivar. Dada dedicated every moment of his life to the advancement of humanity and it is an honor to pay homage to his legacy.
थिंक एव्हरी डे
कुठे शोधीशी रामेश्वर अन् कुठे शोधीशी काशी ।
हदयातील भगवंत राहिला हदयातून उपाशी |
आज मंदिरे ओसंडून वाहत आहेत. प्रार्थनास्थळे तुडूंब भरलेली आहेत. सर्वत्र पूरच -पूर आलेला आहे. पण माणसाचे माणूसपण हरवलेले दिसते.
अशा ह्या काळात माणूस जर हा विचार करेल की, जीभेवर सतत अभिषेक सुरु आहे. तो कोण करतो ? डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जो रक्ताचा संचार सुरु आहे. तो कोण करतो ? मी तर नाही करु शकत याचा अर्थ तो करणारा कुणीतरी आहे.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो ... ती अदृश्य शक्ती माझ्यात येऊन बसली आहे. हा विचार स्थिर झाला तर माणसात बदल व्हायला लागतो. आज जे वैश्विक प्रश्न उभे राहिले आहेत त्या प्रश्नाना श्रीमद्भगवद्गीतेच्या विचारातून उत्तर मिळाल्या शिवाय राहणार नाही.
हे शिल्प आपल्यासमोर आणताना मला सार्थ अभिमान वाटतो की, ज्यांनी मानवाच्या उत्थानासाठी श्वास नि श्वास खर्ची घातला असे तत्ववेत्ते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय विचाराशी जोडल्यामुळे हे शिल्प मी आपल्यासमोर आणू शकलो.