top of page

Sayyam (Defensive War)

Sayyam (Defensive War)

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्नद्रियाणीन्द्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2:५८॥॥

Tortoise has an ability to pull back its limbs into its shell. Just like that every individual should have authority over his senses and intellect to have restraint on organs. Mind remains stable when there is self-control. Mind should be associated with an aim.

 

Abstinence is mocked at, these days. But it is of vital importance in ones life.

 

In this sculpture the body parts of tortoise are interchanged with human body parts. If an individual is able to control various organs in their particular role-play, such as nose to sense right smell, eyes to view right vista, ears for hearing civilized speech, hands to accept the rightful objects; then life would progress.

 

Nature teaches us to follow restraint. Trees follow the restriction of ground and so it flourishes and bears fruits. River follows restrain of its coasts and therefore it is considered as virtuous and praiseworthy. Strings of Sitar follow restrictions of peg to create mesmerizing music.

 

By idealizing Tortoise, Indian culture signals us to follow restraint in person and even socially.

संयम (डिफेन्सीव वॉर)

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः।
इन्नद्रियाणीन्द्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥2:५८॥॥

कासवात स्वतःचे अंग आत ओढून घेण्याची शक्ती आहे. माणसाला इंद्रीयावरती संयम ठेवता आला पाहिजे. जेव्हा इंद्रीयावरती संयम येतो तेव्हा बुध्दी स्थिर होते, बुध्दी ध्येयाशी जोडलेली हवी.

आज संयमाची मस्करी केली जाते. पण मानवी जीवनात संयम अतिशय आवश्यक आहे.

ह्या शिल्पामध्ये कासवाच्या अवयवांच्या जागेवर माणसाचे अवयव लावलेले आहेत. नाकाने कोणता वास घ्यावा. डोळयांनी काय पहावे. तोंडाने काय बोलावे. कानांनी काय ऐकावे. हातानी काय करावे. पायाने कोणती चाल करावी. ह्याचे नियंत्रण जर माणसाला करता आले तर त्याचे जीवन उन्नत होऊन जाईल.

 

निसर्ग आपल्याला संयम समजावतो. वृक्ष धरणीमातेचे बंधन मानतो म्हणुन तो फुलतो, फळतो. नदी तटाचे बधन मानते म्हणुन पवित्र व वंदनीय होते. सतारीची तार खुंटीचे बंधन मानते म्हणुन संगीत निर्माण होते.

 

भारतीय संस्कृती आपल्याला कासवाकडुन वैयक्तिक संयम तसेच

सामाजीक संयम आपल्या जीवनात आणण्यासाठी खुणवत आहे.

bottom of page